Share News

सीमा प्रश्नाच्या सोडवणुकी करिता राष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी आज आपली उमेदवारी घोषित देखील केली

 

आज समितीच्या झालेल्या निवड प्रक्रियेत
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

 

लोकसभा निवडणुकी करिता इच्छुक म्हणून महादेव पाटील यांच्यासह साधना सागर पाटील चंद्रकांत कोंडुसकर आनंदा पटेकर आदींनी अर्ज भरले होते.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या निवडणुका कमिटीचे झालेल्या बैठकीत इच्छुकांच्या मुलाखतीनंतर महादेव पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे.

यावेळी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी साधना पाटील आणि चंद्रकांत कोंडुसकर यांनी माघार घेतली यामुळे महादेव पाटील आणि आपटेकर या दोघांसाठी निवड कमिटीने मतदान प्रक्रिया राबवली या प्रक्रियेत महादेव पाटील यांना 31 पैकी 26 मते मिळाली तर आपटेकर यांना पाच मते मिळाली. यावेळी पाटील यांना सर्वजण पसंती देत लोकसभा उमेदवार जाहीर केले


Share News