Share News

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरात आंदोलन

 

हुबळीतील घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरिता राज्यव्यापी आंदोलन

युवतीच्या हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा द्या -अभावीपची मागणी

 

हुबळी येथील बीव्ही कॉलेजच्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी त्याचा निषेध व्यक्त करण्याकरिता आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले होते.यावेळी हिंदू युवतीला मुस्लिम युवकांनी लव जीहादच्या नावाखाली आज देण्याचा प्रयत्न केला आणि तिची निर्घृण हत्या केली. त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी याकरिता आज बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे ठाण मांडून आंदोलन केले.

तसेच दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या कायदा व सुव्यवस्थेचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून कारवाई करावी. सरकारने अशा आरोपींना कठोर शिक्षा करावी. कायद्याचा धाक नसताना अशा घटना घडू शकतात, कॉलेज कॅम्पस मध्ये सेफ्टी हब तयार करावे,पोलीस विभागांनी या प्रकरणी लक्ष केंद्रित करून उच्चस्तरीय तपास करावा. अन्यथा हे प्रकरण सीबीआय कडे सोपवावी अशी मागणी यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने केली.


Share News