मराठा समाजाला एकत्रित करण्याकरिता मनोज जरांगे पाटील येणार बेळगावला
सीमा भागातील मराठा समाज आणि मराठी भाषकांवर होणारा अन्यायाविरुद्ध सर्व मराठ्यांना मराठी भाषिकांना एकत्रित करण्याकरिता तसेच अन्यायाविरुद्ध लढा देण्याकरिता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील बेळगाव येणार आहेत. बेळगाव येथे त्यांची मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. आज सकाळी जालना येथील अंतरवाली सराटी मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि याविषयी सविस्तर चर्चा केली.