डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त अभिवादन
महादेव पाटील यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून केले अभिवादन
शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर उद्यानात , डॉ बाबा साहेब आंबेडकर यांची 133 व्या जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी म ए समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांनी बाबासाहेबाच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन केले.
याप्रसंगी महादेव पाटील यांनी डॉ आंबेडकरांविषयी आपले विचार व्यक्त केले.तसेच समितीच्या अनेक नेत्यांनी देखील बाबासाहेबाना अभिवादन करून आपले मत मांडले.
प्रारंभी शहरात वीर ज्योत ची मिरवणूक पार पडली त्यानंतर मिरवणूक आंबेडकर उद्यानात पोचल्यावर या ठिकाणी जाहीर सभा पार पडली.