जगदीश शेट्टर आणि घेतले जोतिबा देवाचे दर्शन
जोतिबा देवाचा आज प्रकट दिन सोहळा नार्वेकर गल्ली येथील जोतिबा मंदिरात पार पडला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे बेळगाव लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार जगदीश शेट्टर यांनी मंदिराला भेट देऊन ज्योतिबा देवाची आरती करून आशीर्वाद घेतला.
यावेळी देवदादा अष्टेकर भक्त मंडळाच्या वतीने जगदीश शेट्टर यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर त्यांचा सत्कार केला आणि भाजपचा विजय होईल अशी प्रार्थना केली.
यावेळी जगदीश शेट्टर यांनी आपल्याला बहुमताने निवडून आणून द्यावे, आणि पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार ला विजयी करावे अशी विनंती केली. यावेळी दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळाचे भाविक, मुर्गेन्द्रगौडा पाटील, किरण जाधव, शिल्पा केकरे यांच्यासह भाजपचे सदस्य उपस्थित होते