Share News

मी कोणत्याही अटीशिवाय भाजप मध्ये प्रवेश केलाय -जगदीश शेट्टर

बेळगाव जिल्हा लोकसभा मतदारसंघातून भाजपने जगदीश शेट्टर यांना उमेदवारी दिली आहे. काल त्यांच्या प्रचारार्थ आयोजन करण्यात आले होते तर आज त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते म्हणाले की माझ्यासोबत माजी मुख्यमंत्री बी एस येडीयूरप्पा असल्याने मला आणखीन बळ मिळाले आहे. मी बेळगाव चा विकास प्रामाणिकपणे करणार आहे. बेळगावचा कोणताही प्रकल्प हुबळीला हलवलेला नाही.असे सांगितले.
त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते असे म्हणाले की भाजपमध्ये कोणत्याही अटीशिवाय प्रवेश केला आहे. माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी आरएसएस ची आहे.
तसेच हावेरी, बेळगाव आणि हुबळी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होतो. मात्र शेवटी वरिष्ठानी माझी बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी निवड करून तिकीट दिले असल्याचे सांगितले. तसेच आता रमेश जारकीहोळी भालचंद्र जारकीहोळी माझ्यासोबत निवडणुकीचा प्रचार करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली


Share News