प्रज्वल रेव्हणा प्रकरणी जेडीएस पक्षाचे चप्पल मारो आंदोलन
प्रज्वल रेवण्णा पेन ड्राईव्ह प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा थेट सहभाग असल्याचे कुमारस्वामी यांनी आजच्या ॲडिओ रिलीझद्वारे स्पष्ट केले आहे. सीडी बनवणे हा जितका गुन्हा आहे, तितकाच घरोघरी वितरित करणे हाही गुन्हा आहे, त्यासाठी काँग्रेस पक्षाने आणि , मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदांचा राजीनामा द्यावा. आणि हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणवावे अशी मागणी चप्पल मारो आंदोलन करत आज जीडीएस पक्षाने केली.
यावेळी जेडीएस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने केली आणि आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी जेडीएस जिल्हा युनिट ने दोषींना त्वरित शिक्षा व्हावी आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी केली.