पोलीस आणि शेतकऱ्यामध्ये झटापटी
बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांना वैतागून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतीमध्ये पाणी नसल्याने त्याचबरोबर विद्युत आणि जनावरांना चारा नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.त्याच्या निषेधार्थ आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापटीत झाली. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय समोरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापटी झाली.
यावेळी काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा विरोध जुगारून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. आणि आपल्या मागणीचा निवेदन दिले.