बेळगावात आज अवतरली शिवसृष्टी
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला पावसातही नागरिकांचा प्रतिसाद
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे इतिहासाचा वारसा जपणारी बेळगावातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आज आयोजित करण्यात आली आहे .संततधार पावसातही जवळपास 20 चित्ररथ मिरवणूक आपली कला सादर करताहेत .त्यामुळे जणू शहरात शिवसृष्टीच अवतरणार आहे असा भास होतोय
या चित्ररथ मिरवणुकी मध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंगांचे जिवंत देखावे सादर केले आहेत.
शहरातील नरगुंदकर भावे चौक येथून चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला .हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खुट, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोडमार्गे रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनिमंदिरमार्गे कपिलेश्वर मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता होणार आहे. या मिरवणुकीत शिवजन्मोत्सवापासून शिवराज्याभिषेकापर्यंत विविध सादरीकरण करण्यात येत आहे.पाऊस असला तरी नागरिक चित्ररथ देखावा पाहण्याकरिता गर्दी करत आहेत