Share News

बेळगाव लोकसभा मतदारसंघात 65.67टक्के मतदान

सौंदत्ती आणि बेळगाव ग्रामीण मध्ये 70% मतदान

बेळगाव लोकसभा मतदार संघात आज निवडणूक पार पडली.यावेळी सकाळ दुपार आणि सायंकाळी मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. बेळगाव दक्षिण उत्तर ग्रामीण गोकाक रामदुर्ग सौंदत्ती अरभावी आणि बैलहोंगल मध्ये एकूण 65.67टक्के मतदान झाले आहे. यामध्ये बेळगाव ग्रामीण भागात आणि सौंदत्ती भागात 70 टक्के मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या जास्त आहे
. मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या भागात जनजागृती देखील केली होती मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे या टक्केवारीवरून दिसून येत आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 65.67% मतदान झाले आहे.


Share News