Share News

100% टक्के मतदान व्हावे याकरिता रिक्षाचालकाचे प्रयत्न

स्वेच्छेने विनामूल्य जनसेवा

दिव्यांग वृद्ध यांना आपल्या रिक्षातून मतदान केंद्रावर घेऊन जाण्याचे करताहेत काम

100% मतदान व्हावे याकरिता बेळगावातील एक रिक्षा चालक मोफत जनसेवा करत आहेत. वयोवृद्ध,अपंग, गरोदर स्त्रिया यांनी देखील मतदानाचा हक्क बजवावा याकरिता रिक्षा चालक ज्ञानेश्वर अष्टेकर हे सकाळपासून जनसेवा करत आहेत. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ते अशाच प्रकारे 100% मतदान व्हावे याकरिता प्रयत्नशील असतात. निवडणुकीदरम्यान ते दिव्यांगाना आपल्या रिक्षातून स्वेच्छेने विनामूल्य घेऊन जातात आणि परत घरी पोहोचवितात. यंदाही त्यांनी ही सेवा दिली आहे.

https://youtu.be/33SQcsmV1zE si=v_6T40KWq3paO_fh

घटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे हे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे तसेच प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाही बळकट करावी मात्र ज्यांना मतदान केंद्रावर जाणे शक्य नाही अशा करीता बेळगावातील रिक्षा चालक ज्ञानेश्वर अष्टेकर हे धावून जात आहेत आणि मोफत विनामूल्य स्वेच्छेने जनसेवा करत आहेत.


Share News