Share News

स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटामाटात संपन्न

‘शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथं, असा महापराक्रमी पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा…’, अशा गजरात शुक्रवारी सकाळी 7 वाजता छत्रपती धर्मवीर संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीने धर्मवीर संभाजीराजेंचा राज्याभिषेक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यांत आला,

प्रारंभी माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज स्मारकास दुग्धाभिषेक घालून विधिपूर्वक पूजा करून नगरसेवक जयतीर्थ सौन्दती, व सुनिल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला एक भव्य आहार अर्पण करण्यात आला. तसेच परिसराला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली होती.

याप्रसंगी बोलताना माजी आमदार अनिल बेनके यांनी
भारताच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद आहे. 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजीराजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला होता. वयाच्या 32व्या वर्षी 128 युद्ध जिंकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा खरोखर इतिहासातला सुवर्ण प्रसंग आहे.या घटनेचा सोहळा म्हणून आज बेळगावात दरवर्षीप्रमाणे एखाद्या सणाचं रूप आलं आहे. तमाम शिवप्रेमी आणि छत्रपतींच्या थेट शिवभक्तांनी आज धर्मवीर संभाजीराजे चौकात अत्यंत नेत्रदिपक असा राज्याभिषेक सोहळा पार पडला.दरम्यान, संभाजी महाराज हे वयाच्या अठराव्या वर्षी युवराज आणि तेविसाव्या वर्षी छत्रपती झाले. किल्ले रायगडावर त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. आपल्या कारकिर्दीत ते 201 लढाया लढले. त्यापैकी एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नव्हता. कारण त्यांनी स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. रयतेसमोर त्यांनी स्वराज्य आणि स्वधर्माचा आदर्श घालून दिला होता. अशा थोर राजाला मानाचा मुजरा!!! ,असा संदेश उपस्थितांना बेनके यांनी दिला.

स्मारक समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव यांनी या वेळी छत्रपती संभाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्य रक्षणासाठी खर्ची केले.कमी वयात सर्वांत जास्त युद्धे करून शत्रूवर विजय प्राप्त केले. स्वराज्याचे पालनपोषण व संरक्षण केले. हा प्रेरणादायी इतिहास बेळगाव शहरात त्यांच्या स्मारकाच्या माध्यमातून कायमस्वरूपी जिवंत राहावा यासाठी स्मारक समिती प्रयत्नशील आहे.जगावे कसे हे शिवरायांनी शिकवले, तर मरावे कसे हे शंभूराजांनी शिकवले’ अश्या शब्दात सुनिल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी नगरसेवक नगरसेवक जयतीर्थ सौन्दती, धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव,प्रसाद मोरे श्रीनाथ पवार, निशांत कुडे मारुती पाटील यश पाटील आदित्य पाटील,सुशांत तरहळेकर निखिल पाटील उदित रेगे किसन खांडेकर,योगेश भोसले भरत काळगे ,छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सर्व सदस्य, महिला भगिनी, युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Share News