सार्वजनिक बांधकाम खात्याने हटविली पोलीस बंदोबस्तात भिंत
सातत्याच्या तक्रारी येत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई
बेळगावातील वडगाव मधील मंगाई मंदिराजवळील भिंत उभारल्याने मंगाई नगर रहिवाशांकरिता रस्ता बंद झाला होता.या प्रकरणी रहिवाशांनी सातत्याने पाठपुरावा करत भिंत हटवण्याची मागणी केली होती त्याची अखेर दखल घेत काल सायंकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याने पोलीस बंदोबस्तात ही भिंत हटवली आहे यावेळी भिंत हटवल्याने काही प्रमाणात वादावादी देखील झाली. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने पोलीस बंदोबस्तात अखेर ती भिंत हटवली
मंगाई नगर रहिवाशांनी संघाने या भिंतीविरोधात महापालिका जिल्हाधिकारी पालकमंत्री या सर्वांनी निवेदन दिले होते रहिवाशांना याचा त्रास होत असल्याने ही भिंत तात्काळ हटवण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळे याची दखल घेऊन ही भिंत अखेर पोलीस बंदोबस्त पाडण्यात आली.