Share News

दुसऱ्या दिवशी ही हजारो शिवभक्तांची उपस्थिती

दुर्गामाता दौडीचा आज दुसरा दिवस श्री गणेश मंदिर चन्नामा चौक येथुन प्रारंभ झाली. आजच्या दोडीची सुरुवात करण्यासाठी ACP कट्टीमणी आणि नगरसेवक शिवाजी मडोळकर यांच्या हस्ते आरती करून ध्वज चढवण्यात आला. त्यानंतर खडक गल्ली, चव्हाट गल्ली, शिवाजी नगर , गांधी नगर येथे निघालेल्या दौडीत हजारोंच्या संख्येत शिवप्रेमी सहभागी झाले होते.

गल्लोगल्ली शिवभक्तांनी उत्साहीपणे स्वागत करण्यात आले. किल्ला येथे महार बटालियनच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. दौडीच्या मार्ग मध्ये आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या भगवे फेटे परिधान करून तरुण तरुणी दौडी मध्ये सहभागी झाले होते

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आयोजित श्री दुर्गामाता दौडीचे गांधीनगर परिसरात तसेच किल्ल्यातील मिलिट्रीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले होते प्रत्येक घरासमोर महीला मुली ध्वजाची आरती करूण औक्षण करत होते. लहान मुलांना मुलींना छ. शिवाजी महाराज, जिजाऊ या पेहराव्यात तयार करूण ठीक ठीकाणी ध्वजाचे स्वागत केले जात होते. संपूर्ण गांधीनगर परिसर भगवेमय झाले होते. जागो जागी डॉल्बिवर शिवरायांचे पोवाडे, अंबामाता दूर्गामाता यांच्या गाण्यांनी संपूर्ण भक्तीमय झाले होते. संपूर्ण परिसरात मराठमोळ्या वातावरणात व देवदेवतांच्या जयघोषात. व पुण्यश्लोक, तसेच राष्ट्र भक्तीधारांच्या गीतांनी संपूर्ण वातावरण जल्लोषी झाले होते.

बाळ गोपाळांची संख्या लक्षणीय आहे. देश भक्तीपर गीतां मुले मावळ्यांमध्ये उत्साह वाढत होता. ठिकठिकाणी महिलांनी आरती करून दौडी चे स्वागत केले. किल्ला येथे महार रेजिमेंट च्या वतीने दौडीच्या स्वागत करण्यात आले


Share News