
ठगी पिढी जमाकर्ता परिवार च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि या निवेदनात त्यांनी आपल्याला ज्या कंपन्यानी फसवली आहे.त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ठिय्या आंदोलन करून केली आहे.जोपर्यंत सरकारी प्रशासन आणि इतर प्राधिकारणांकडून कायद्याचे पालन करणे आणि फसवणूक झालेल्या पिढतांना पैसे देण्यात येत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन चालूच ठेवणार असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 2019 मध्ये अनेक कंपन्यांनी 180 दिवसांच्या आत तिप्पट परतावा देऊ असे आमिष दाखवून अनेक नागरिकांचे पैसे घेतले होते मात्र आता पाच वर्षे झाली तरी पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे त्यामुळे संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी ठगी पिढी जमाकर्ता समाजाच्या वतीने करण्यात आली आहे