महाराष्ट्र सरकार कन्नड शाळांना दर्जेदार पाठ्यपुस्तके देत आहे हे कौतुकास्पद मात्र ….
बाराखडी कन्नड पुस्तके कन्नडमध्येच द्यावीत- पत्रकार परिषदेत कर्नाटक सरकारकडे मागणी
विजयपुर, जत , सांगली येथील कन्नड भाषिक शाळांमधील मुलांचे हित लक्षात घेण्याची मागणी
युवा विकास संघाची बेळगावात पत्रकार परिषद
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरून असणाऱ्या जत तालुक्याततील महाराष्ट्राच्या हद्दीत येणाऱ्या शाळेमध्ये महाराष्ट्र सरकार कन्नड शाळांना दर्जेदार पाठ्यपुस्तके देत आहे हे कौतुकास्पद आहे. पण कर्नाटक सरकारचे. बाराखडीचे (नलीकली )हे पुस्तक कन्नडमध्ये असावे. मात्र तेही मराठी भाषेत दिले जात असल्याने कन्नड मुलांची गैरसोय होत आहे त्यामुळे विजयपुर, जत , सांगली येथील कन्नड भाषिक शाळांमधील मुलांचे हित लक्षात घेऊन त्यांनी कर्नाटक सरकारने कन्नड पुस्तके मुलांना पुरवण्याची मागणी युवा विकास संघाच्या संस्थापक अध्यक्ष श्रीधर बिजरंगी यांनी आज बेळगावात पत्रकार परिषदेत केली.