*सदलग्यातील रिंग रोड वर गतीरोधक बसवण्याची मागणी*
सदलगा
येथील छ. शिवाजी महाराज सर्कल ते रत्नाप्पाण्णा कुंभार सर्कल दरम्यानच्या सहा साडेसहा कोटी रुपये खर्च करुन निर्माण केलेल्या रस्त्यावर सदलगा शहरातील कुवेंपु, सदलगा हायस्कूल आणि कुंद कुंद कन्नड शाळेजवळ गतीरोधक बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग च्या नांवे निवेदन उपतहसीलदार पी बी शिरिवंत यांच्याकडे सादर करण्यात आले. या नवनिर्मित रस्त्याच्या दक्षिण बाजू आणि पूर्व बाजू अशा एकाच बाजूला पदपथ तयार केला असून तो अपूर्ण पडत आहे त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ आणि कठडे उभारावेत.
ऊस गळीत हंगामात उसाच्या अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा विचार व्हावा.
या मार्गावरील कांहीं अपघात ठिकाणी गतीरोधक बसवावेत.
या रस्त्यावर अपघातात तरुण-वृद्वांनी प्राण गमावले आहेत. तेंव्हा, शाळा भरताना आणि सुटताना या रस्त्याच्या दोन्ही टोकांना बॅरिकेड्स लावून एक वाहतूक पोलीसाची नियुक्ती करुन विद्यार्थ्यांना शाळा ते घर अशी सुरक्षित ये – जा करण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन उपतहसीलदारांकडे सादर केले आहे.
यावेळी महसूल निरिक्षक एम. ए. नागराळे यांच्यासह अतिक्रांत पाटील, सुधीर पाटील, भरत बदनीकाई, सुभाष प्रधाने, दादासाहेब कोगनोळे,सचिन पाटील , आनंद पाटील, अशोक बाजक्के , दरेप्पा हवालदार, श्रेणिक वडगावे, पिंटू तिप्पाण्णावर, गिरीश जगताप आणि असंख्य पालक उपस्थित होते.