कारवार
गेल्या चार दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारभार येथे एन एच 66 वर आज सकाळी दरड कोसळल्याने महामार्गावर थांबलेला गॅस टँकर वाहून गेल्याची घटना घडली आहे
कारवार मंगळूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर अंकोला तालुक्यातील शिरूर येथे ही घटना घडली.दरड कोसळल्याने वाहतूक करणाऱ्या टँकर गंगावली नदीत वाहून गेला दरड कोसळण्याच्या पूर्वी हा टँकर रस्त्यावर थांबवण्यात आला होता .त्या महामार्गावर वाहने ,चहाचे दुकाने आणि आजूबाजू परिसरातील असलेले घरे ही वाहून गेली आहेत गॅसची वाहतूक करणारे दोन टँकर गंगावली नदीत वाहून गेले आहेत याची अधिक माहिती कारवारचे आमदार सतीश
सैल यांनी विधानसभेत दिली आणि त्यासोबत या घटनेला जबाबदार कोण असा सवाल ही विचारला
या घटनेमध्ये आतापर्यंत मिळाल्या माहितीनुसार सात जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती कारवारचे खासदार विश्वेश्वर कागेरी हेगडे यांनी वृत्तालाच दुजोरा दिला त्याच सोबत कारवारच्या जिल्हाधिकारी लक्ष्मी प्रिया यांनी हे दोन टँकर ज्या नदीत बुडाले त्या टँकर मधून वायुगळती होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकडच्या घरांना तात्काळ सुरक्षा ठिकाणी घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या