आंबोली घाटात भला मोठा दगड अचानक रस्त्यावर कोसळला
घाटात दोन्ही बाजुची वाहतूक तब्बल साडेतीन तास बंद
आंबोली घाटात भला मोठा दगड अचानक रस्त्यावर त्यावेळी कोणतेही वाहन नसल्याने अनर्थ टळला. किरकोळ छोट्या गाड्या वगळता घाटात दोन्ही बाजुची वाहतूक तब्बल साडेतीन तास बंद. माडखोल येथून जेसीबी आल्यानंतर दगड हटाविल्या नंतर वाहतुक पूर्ववत. सकाळी पावणेआठची घटना.
आंबोली घाटात मुख्य दरडींच्या ठिकाणच्या खालील बाजूस सुमारे पाचशे मीटर अंतरावरील वळणावर एक भला मोठा दगड अचानक रस्त्यावर येऊन आदळला. त्या ठिकाणी खड्डा ही पडला आहे. हा दगड एवढा मोठा होता की त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतुक थांबविण्यात आली कारण दगड बरोबर रस्त्याच्या मधोमध येऊन थांबल्याने मोठ्या गाडया पास होत नव्हत्या त्यामुळे एस्टी प्रवाशांचे मोठे हाल झाले. तर आंबोली हून खाली येणाऱ्या एस्टी आंबोली बसस्थानकातच थांबविण्यात आल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आंबोलीत जेसीबी नसल्याने जेसीबी माडखोल येथून मागविण्यात आला त्याला यायला वेळ झाल्याने वाहतुक थांबविण्यात आली. सकाळी साडेअकराच्या दरम्याने जेसीबीच्या सहाय्याने दगड बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली. यावेळी आंबोली पोलीस हवालदार दिपक शिंदे घटनास्थळी होते. यापूर्वी पूर्वीचा वस तर मंदीर जवळील .चाळीस फूटाची मोरी येथे ही भला मोठा दगड रस्त्यावर पडून खड्डा तयार झाला असून आता तो अपघाताला निमंत्रण देत आहे .