बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकारही चालूच आहेत
गोवा बेळगाव महामार्गावरील गोवा हद्दीत असणाऱ्या अनमोड घाटात ही गुरुवारी सकाळी सात वाजता दूध सागर मंदिराच्या एक किलोमीटर खालच्या बाजूला दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती तर कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक शगुन सावंत तसेच फोंडा ट्रॅफिक पोलिसांचे निरीक्षक कृष्णा सिनरी यांनी आपल्या सहकार्यासोबत जाऊन सदर दरड हटवून सायंकाळी चार वाजेपर्यंत पर्यंत वाहतूक सुरळीत केली
परंतु सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे
तर याच बरोबर कॅसल लॉक पासून दूध सागर धबधब्या पर्यंतच्या लोहमार्गावर ही प्रचंड पाऊस पडत असल्याने लोहमार्गावरही दरड न कोसळण्याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.तर सतत पडणाऱ्या पावसामुळे,अनेक खेडोपाड्यातील ब्रिजीस भरल्यामुळे,अनेक खेढ्यातील लोंकांचा सम्पर्क ही तुटला आहे..