VTU 24 वा दीक्षांत समारंभ
तिघांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित
हजारो विद्यार्थाना पदव्या प्रदान
बेळगाव : विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीचा 24 वा दीक्षांत समारंभ विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधील अब्दुल कलाम सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला
या दीक्षांत समारंभात B.E/B.Tech विभागातील 51,129 विद्यार्थ्यांना, B.Plan विभागातील 8, B. Arch विभागातील 1,138 व संशोधन विभागातील 340 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
हा समारंभ राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झाला भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक प्रा.गोविंदा रंगराजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
तर चिक्कबल्लापूरच्या श्री मधुसूधन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चचे संस्थापक श्री मधुसूदन साई आणि बंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लि.चे व्यवस्थापकीय संचालक हरी के मरार यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
कुलपती डॉ. एस. विद्याशंकर, प्रा. टी. एस. श्रीनिवास, प्रा. बी.ई. रंगास्वामी आदी उपस्थित होते.