केंद्र सरकारने मागण्या मान्य करावे याकरिता बेळगाव मध्ये आंदोलन
केंद्र सरकारने शेतकरी आणि शेतमजुरांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात याकरिता ग्रामीण कुलीकार्मिक संघटनेच्या वतीने आज बेळगाव मध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी चन्नम्मा सर्कल येथे साखळी आंदोलन आंदोलकांनी केले आणि केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात त्यांनी शेतमजुरांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाकरिता प्रत्येक वर्षी किमान 200 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून द्यावा,शेतकरी आणि शेतमजुरांवर लावलेला कर माफ करावा, असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकारी कामगारांच्या बरोबरीने वेतन देण्यात यावे त्यासाठी किमान वेतन 800 रुपये प्रतिदिन जाहीर करावे. या सर्व मागण्यांसोबतच दिल्ली सीमेवर बसलेल्या शेतकरी कामगार संघटनांच्या सर्व मागण्यांवर सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली आहे.