Share News

बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यात आज सकाळी एका तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली.
बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील लक्ष्मेश्वर येथील यासिन मोमीन (वय 28) यांचा आज पहाटेच्या सुमारास अचानकपणे माथेफिरूंच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तरुणावर हल्ला करून पळून जाणाऱ्या टोळीच्या घटनेने लक्ष्मेश्वर येथील ग्रामस्थ हादरले.
यासीन मोमीनवर प्राणघातक हल्ला होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला असून, अनैतिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर खून झाल्याचा संशय पोलीस करत आहेत.यासिन हा आपल्या पत्नीला घेऊन दुचाकीवरून जात असताना माथेफुरूनी हा हल्ला केला आहे या घटनेत पत्नी देखील जखमी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच कुलगोडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली


Share News