दूधसागर धबधबा घालतोय पर्यटकांना भुरळ
देशातील सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या धबाधब्यांमध्ये दूधसागर धबधब्याचे नाव आवर्जुन घेतले जाते. पर्यटकांनी पावसाळ्या दरम्यान आपल्या पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये दूधसागर धबधब्याचा आवर्जून समावेश करावा असा हा धबधबा. पावसाळ्या दरम्यान गोव्याला जातेवेळी वाटेत लागतो तो उंच उंच डोंगरावरून कोसळणारा आणि दुधासारखा फेसाळत मनमोहून टाकणारा असा हा दूधसागर धबधबा. हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा असून, ३९० मीटर उंचीवरून तो खाली पडतो. यामुळे याची भुरळ चित्रपट सृष्टीलाही बसली आहे. हा धबधबा जितका रोमहर्षक आहे तितकाच वरून कोसळताना अल्हादायी वाटतो ,धबधब्या अंगावर येणारऱ्या वाऱ्याच्या पाण्याचे एक वेगळाच अनुभव मिळतो.