इंस्टाग्राम वर झालेल्या प्रेमातून खून
पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून
तीन महिन्याच्या गरोदर युवतीचा खून
इंस्टाग्राम वर झालेल्या प्रेमाचे रूपांतर लग्नामध्ये झाले. त्यानंतर सदर युवती तीन महिन्याची गर्भवती झाल्यानंतर तिच्या पतीने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना बेळगावातील ग्रामीण भागात घडली आहे. अशी माहिती आज बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांनी दिली आहे. सदर युवती लग्न झाल्यावर एक वर्षाने गरोदर राहिली होती.लग्न झाल्यावर त्यांच्यामध्ये नेहमी खटके उडत असत. खून झालेल्या युवतीवर मानसिक व शारीरिक अत्याचार करणे येत होते याबद्दल तिने आपल्या घरच्यांना देखील सांगितले होते. मात्र रागाच्या भरात तिच्या पतीने तिचा गळा वळून खुन केला असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस स्थानकात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत असून
आम्ही दोषींना अटक करून कायद्यानुसार शिक्षा करू असं सांगितलं. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.