Share News

पिडिओंचे विविध मागण्यांसाठी जिल्हापंचायत कार्यालयासमोर निदर्शने

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी

सर्वसामान्य जनतेला ७० टक्के सेवा या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्राम पंचायतीद्वारे पुरविल्या जातात. मात्र, ग्राम पंचायतमधील पीडीओ, सचिव, द्वितीय श्रेणीतील लेखा साहाय्यक, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मार्गी लागाव्यात, यासाठी २ ऑक्टोबरपासून राज्यभरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सेवा बंद ठेवून बेमुदत संप पुकारला आहे . तातडीने पीडीओ व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी पीडीओ, कर्मचारी संघटनेतर्फे जि. पं. कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले .ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बदली, बढती, वेतन आणि द्वितीय श्रेणीतीलकर्मचाऱ्यांची मागण्यांसाठी बढती आंदोलन आदी केले.


Share News