वादळी वाऱ्याने नारळाचे झाड विद्युत खांबावर पडले
झाड पडून चार खांबांचे नुकसान
रस्त्यावर कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला
वादळी वाऱ्याने बेळगाव शहरातील हिंदवाडी घुमटमाळ दुसरा क्रॉस येथे नारळाचे झाड इलेक्ट्रिकल केबल वर पडल्यामुळे चार खांब मोडून पडले .या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही.
बेळगावातील हिंदवाडी येथे रात्री सुसाटं वाऱ्यामुळे नारळाचे झाड अचानक पणे विद्युत तारेवर कोसळले आणि जवळपास चार खांब तुटून पडले.रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे रहिवाश्यानी सांगितले.रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली .त्यामुळे या भागातील विधुत पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता .
या मार्गावरून कोणतीच रहदारी नसल्यामुळे सुदैवाने अनुचित प्रकार घडला नाही, विद्युत खांबावर नारळाचे झाड पडल्यामुळे दहाच्या सुमारास मोठा आवाज आला आणि पाहताच चार खांबे तुटून पडलेले पाहाव्यास मिळाले रात्रीची वेळ असल्यामुळे या मार्गावर रहदारी नव्हती सकाळी हेस्कॉम विभागाने या ठिकाणी भेट देऊन विद्युत खांब आणि नारळाचे झाड काढले आणि दुपार नंतर रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला