Share News

 

बेळगावातील स्क्रॅप दुकानाला आग

 

पहाटे सहा वाजता लागली आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत मिळविले आगीवर नियंत्रण

मोठा अनर्थ टाळला

 

 

बेळगावातील खंजर गल्ली येथे स्क्रॅप दुकानाला आज सकाळी सहा वाजता भीषण आग लागली भर वस्तीमध्ये आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशामक दलाच्या गाड्या काही वेळीच दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. स्क्रॅप अड्ड्याला आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.लोकवस्तीत स्क्रॅप अड्डा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने आग विझविण्यात त्यांना यश मिळाले.

 


Share News