बेळगावातील कर्ले गावाच्या युवकाचा झाड पडल्याने जागीच मृत्यू
बेळगुंदी बीजगर्णी रोडवर झाला अपघात
जखमींना इस्पितळात दाखल
बेळगुंदी बीजगर्णी रोडवर झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे या घटनेत बाईक स्वार आणि इतर दोघे जखमी झाले आहेत. हे तिघेही बाईकवरून जात असताना आज सकाळी झाड कोसळल्याने अपघात झाला आहे. जखमींना इस्पितळात दाखल करण्यात आली असून मृत्यू झालेली व्यक्ती ही कर्ले गावाची रहिवासी आहे. तसेच जखमी झाले देखील याच गावचे रहिवासी आहेत. यावेळी घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.