Share News

बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

भरधाव बस शेतवाडीत कलंडली

भरधाव बसची दुचाकीला धडक बसून बेळगाव गोकाक रोडवरील खनगाव खुर्द जवळ झालेल्या अपघातात बेळगाव येथील सुळेभावी गावातील तरुणाचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल दत्ता लोकरे वय 30 राहणार कलमेश्वर नगर सुळेभावी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
विठ्ठल हा आपल्या होंडा एक्टिवा वरून बेळगावकडे येत होता त्यावेळी बेळगाव गोकाक बसची दुचाकीला धडक बसली गंभीर जखमी अवस्थेतील विठ्ठला सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविताना वाटेतच मृत्यू झाला.
दुचाकीला ठोकरल्यानंतर बस रस्त्या शेजारील शेतवाडीत कलंडली.


Share News