कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे निधन
सरस्वती सन्मान आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते, प्रख्यात कन्नड कादंबरीकार, विचारवंत आणि ज्येष्ठ लेखक एल. एल. भैरप्पा यांचे वयाच्या 94 व्या वर्षी बुधवारी (दि.24) दुपारी निधन झाले.
ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बंगळूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते म्हैसूर येथे राहत होते. त्यांच्यावर मागील तीन महिन्यांपासून बंगळूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
त्यांच्या बहुतांश कादंबर्यांचा मराठीत अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या पुस्तकांना मराठी वाचकांकडून मोठी मागणी असते. पर्व, काठ, धर्मश्री, तडा, आवरण, वंशवृक्ष आदी कादंबर्यांचा समावेश आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2010 मध्ये सरस्वती सन्मान, 1975 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि 2023 मध्ये पद्मभूषण यासह अनेक महत्त्वाचे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

