बी के मॉडेलला उत्तरच्या आमदारांची भेट
बी. के. मॉडेल हायस्कूलचा शतकमहोत्सवी कार्यक्रम २० डिसेंबर ते २३ डिसेंबर या काळात होणार आहे. महोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यासाठी आमदार असिफ राजू सेठ यांनी शाळेला भेट दिली.
प्रारंभी संस्थेतर्फे अध्यक्ष अविनाश पोतदार आणि सचिव श्रीनिवास शिवनगी यांनी त्यांचे
पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. शतक महोत्सवासंदर्भात त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आ. सेठ सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

