27 फेब्रुवारी कवी वी. वा. शिरवाडकर यांच्या जन्म दिनानिम्मित मराठी भाषा दीन साजरा केला गेला . बापट गल्लीतील श्री कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने दर वर्षी मराठी भाषा दीन साजरा केला जातो गल्लीतील पांच गोपाळराव केसरकर यांच्या हस्ते कवी वी. वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
महेश पावले यांनी बेळगावच्या बोली भाष बोलण्यात जो गोडवा आहे तो अन्य भाषेत मिळणार नाही तसेच भाषा बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर केला जातो तसे न करता अनेक परकीय भाषेला मराठी शब्दांचा पर्याय उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा असे सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा आपल्या पाल्यांना मराठी वाङ्मय वाचनाची सवय लावावी जणे करून मराठी भाषा समृध्द होईल असे विचार मांडले.
यावेळी सुनील मुरकुटे,भाऊ किल्लेकर,सुनील केसरकर, गजानन नीलजकर, महादेव केसरकर, नंदू मोरे, अभिषेक नीलजकर,अमोल किलेकर आदी उपस्थित होते