Share News

रेणुका यल्लम्मा देवी मंदिराच्या दान पेटीत 11.23 कोटींची रक्कम जमा

मागील वर्षीच्या तुलनेत यात 2.40 कोटींची लक्षणीय वाढ

 

2023-24 या आर्थिक वर्षात, बेळगाव जिल्ह्यातील सौन्दती तालुक्यातील रेणुका यल्लम्मा देवी मंदिराच्या दान पेटीत 11.23 कोटींची उल्लेखनीय रक्कम जमा झाली आहे .मागील वर्षीच्या संकलनाच्या तुलनेत यात 2.40 कोटींची लक्षणीय वाढ झाली आहे.

रेणुका यल्लम्मामंदिर हे दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील भक्तांना आकर्षित रेणुका मंदिर करते .मंदिराच्या हुंडीमध्ये रोख, सोने आणि चांदीचे दागिने अर्पण करून भाविक आपली मागणी पूर्ण करतात .

2022-23 या कालावधीत, भक्तांनी 8.83 कोटी रोख, तसेच ₹66.28 लाख किमतीचे सोन्याचे दागिने आणि ₹15.43 लाख किंमतीचे चांदीचे दागिने यल्लम्मा देवीला अर्पण केले.

तर 2023-24 च्या त्यानंतरच्या आर्थिक वर्षात, 10.22 कोटी रोख, 84.14 लाख सोने आणि 16.65 लाख चांदीचे दागिने यल्लम्मा देवीच्या मंदिरात दान दिले आहे.


Share News