बेळगाव ब्रेकिंग
गोकुळने सीमा भागात दूध दर कमी केल्याने शेतकऱ्यांनी ठोकले गोकुळ दूध युनिटला टाळे
गोकुळ दूध संघाने सीमा भागातील दुध दर कमी केले आहे त्यामुळे हे दर पूर्ववत करावेत याकरिता आज बेळगाव येथील अलतगा गावांमध्ये दूध पुरवठा करणाऱ्या व्यवसायिकांनी आंदोलन छेडले आणि जोपर्यंत दूध दर पूर्ववत करत नाहीत तोपर्यंत बेळगाव येथील अलतगा गावातील गोकुळ क्लस्टर च्या दूध उत्पादक संघाला आक्रमक पवित्रा घेत टाळे ठोकले.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सीमा भागातील म्हशीच्या व गायीच्या खरेदी दरात कपात केली आहे.आधीच पशुखाद्य व वैरणीदर भरमसाठ वाढले असताना फक्त सीमा भागातील दूध कमी करणे हा शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याने शेतकऱ्यांनी बेळगाव येथील #gokul दूध उत्पादक युनिटला टाळे ठोकले.
यावेळी विस्तार अधिकारी निवृत्ती हारकारे यांनी गोकुळचे व्यवस्थापक शरद तुंबरेकर यांच्याशी फोनवर बातचीत केली त्यानंतर त्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयावर तोडगा काढू असे सांगितलय.
गोकुळ दूध संघाची कोल्हापूर मध्ये 27 तारखेला बोर्ड मीटिंग बोलविण्यात आली आहे मीटिंगमध्ये यावर तोडगा काढला जाईल यावेळी सांगण्यात आले.