सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शिवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीमा संरक्षण ची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीय कन्नड संघटनांनी आपल्याला कोणत्या समस्या येत आहे याबद्दल माहिती दिली.
तसेच या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच त्यांच्यावर गुंडा कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी या बैठकीत केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांच्यामुळे बेळगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगावची कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्यामुळे बिघडत आहे .
जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत मराठी भाषिक शांत बसणार नाहीत यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी या बैठकीत केली.
यावेळी निवृत्त न्यायाधिशांनी कन्नड संघटनांना चांगली चपराक दिली ते म्हणाले की आम्ही काही सरकारचे एजंट नाही मध्यस्थी करण्याकरिता वर सरकारच निर्णय घेईल आम्ही फक्त सीमा पाणी भूमी यावर सांगू शकतो.